News Bharati

शाळांना आत्ताच सुट्टी जाहीर करा; राज ठाकरेचं सरकारला आवाहन

मुंबई : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून तापमान प्रचंड वाढलं आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. मुंबई, रायगड, ठाणे शहरात १५ एप्रिल आणि १६ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उन्हाचा त्रास वाढल्याने मुलांच्या शाळांना सुट्ट्या देण्याचं आवाहन सरकारला केलं आहे.

  • राज ठाकरे यांनी ट्विट मध्ये काय म्हणलंय पहा…

गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास ४० अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो.

अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागत आहे. ह्याबाबतीत, जरी आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी. तसंच उन्हाळ्याचा दीर्घकाळ शिल्लक आहे, त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील ह्याचे अचूक अंदाज आले तर एकूणच लोकांना त्यांच्या कामांचं नियोजन करता येईल.

  • मनसैनिकांना काय केली विनंती

माझी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की, तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्या. तसंच ह्या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्षांचे (राजकीय नव्हेत) आणि निराधार आणि बेघर लोकांचे. त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल ह्याची तजवीज करा. आणि प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅल्लरीत, गच्चीत पाणी ठेवा. असं ट्विट मध्ये काय म्हणलंय.


NB मराठीच्या WhatsApp चॅनल फॉलो करा : https://whatsapp.com/channel/0029VaWO0HLCRs1iZlueP42F

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *