News Bharati

राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांचा शपथविधी

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात उपसभापती नीलम गोऱ्हे या नवनियुक्त आमदारांना सदस्यत्वाची शपथ दिली. चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, पंकज भुजबळ, इद्रिस इलियास नाईकवाडी, हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे या सात सदस्यांची राज्यपालांकडून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपा
१. चित्रा वाघ
२. विक्रांत पाटील
३. धर्मगुरु बाबुसिंग महाराज राठोड

राष्ट्रवादी अजित पवार गट
४. पंकज भुजबळ
५. इद्रिस नाईकवाडी

शिंदे गट
६. हेमंत पाटील
७. डॉ. मनीषा कायंदे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *