News Bharati

रवी राजा यांचा भाजपात प्रवेश

रवी राजा यांचा आज भाजपात प्रवेश झाला. रवी राजा (Ravi Raja) हे काँग्रेसमध्ये होते. सायन कोळीवाडा या ठिकाणाहून त्यांना तिकिट हवं होतं. मात्र काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

https://x.com/i/status/1851870981599695264

रवी राजा यांनी मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद भुषवलं आहे. आपल्याला सलग दोनदा डावललं गेलं आहे त्यामुळे आपण काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहोत असं रवी राजा यांनी म्हटलं आहे. रवी राजा तीन दशकांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये होते. ऐन विधानसभेच्या तोंडावर रवी राजा ( Ravi Raja ) यांनी काँग्रेसला हात दाखवत कमळ हाती घेतलं आहे. त्यांच्याबरोबरच बाबू दरेकर या शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षातले नेते भाजपात आले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *