News Bharati

तुम्ही बहीणी साठी लढायला तयार आहात म्हणून विचारते. या बहिणीसाठी तुम्ही काय करणार; स्वप्ना पाटकर याचं उद्धव ठाकरे यांना पत्र

मुंबई : प्रसिद्ध निर्माती आणि सामाजिक कार्यकर्त्या, पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर (Swapna Patker) यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुन्हा एकदा पत्र लिहल आहे. यामध्ये त्यांनी महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले आहेत. तसेच, यात त्यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. स्वप्ना पाटकर यांचं ट्विट भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी रिट्विट केलं आहे. \”उद्धव ठाकरेजी, तुमच्या उत्तराची महाराष्ट्र वाट पाहतोय,\” असं चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या आहेत.

  • स्वप्ना पाटकर यांचं पत्र

नमस्कार उद्धवदादा,

महिला सुरक्षितते बद्दल तुम्हाला बोलताना ऐकून खूप आनंद झाला. “नराधमांना तर शिक्षा झालीच पाहिजे, पण त्यांना पाठीशी घालणाऱ्यांनासुद्धा शिक्षा झाली पाहिजे. पोलिसांवर दबाव आणला असेल, तर दबावाखाली आलेले पोलीस सुद्धा नराधमांएवढेच विकृत आहेत.” असे तुमचे ट्विट वाचून बरं वाटले.

मी 2016 ते 2021 तुम्हाला अनेक ईमेल लिहिले. सत्य परिस्थिती कळवली. संजय राऊत कसे माझा पाठलाग करत होते, मला धमकावत होते आणि त्यांच्या शिवाय इतर कोणा सोबत काम करू देणार नाही असं म्हणून घाबरवण्याचा प्रयत्न करत होते, हे मी फार स्पष्ट आपल्याला कळवले होते. माझावर हल्ले झाले, मला वेग वेगळ्या पोलीस स्टेशनला संबंध नसताना बोलावले जायचे, माझे काम बंद करण्यात आले, घरा बाहेर काढणार हा दबाव टाकला गेला. सगळे माहित असून तुम्ही काहीच मदत केली नाही. याचे मात्र मला वाईट वाटले.

माझा एक चित्रपट \”डॉक्टर रखमाबाई\” रिलीज होऊ दिला नाही. माझे आणि अनेक कलाकारांचे प्रचंड नुकसान तुम्ही केले असे मला राऊत यांच्याकडून सांगण्यात आले. पण मला वाटत नाही तुम्ही असं कराल. त्यांनीच केले हे मला माहित आहे. फोन वर शिव्या गाळ, घर उध्वस्त केले, काम बंद करून जगण्याचे साधन संपवले. हे सगळे माहित असून देखील तुम्ही त्यांना पूर्ण शिवसेना हातात दिली. आणि त्यांनी माझी वाट लावली तशीच पक्षाची वाट लावली. असो. आता तुम्ही बहीणी साठी लढायला तयार आहात म्हणून विचारते. या बहिणीसाठी तुम्ही काय करणार ते महाराष्ट्राला नक्की सांगा. मी वाट पाहत आहे. तुमची लाडकी बहीण, स्वप्ना पाटकर.

दरम्यान, स्वप्ना पाटकर यांनी आपल्या पत्रातून उद्धव ठाकरे यांना विचारले आहे की, महिला सुरक्षिततेसाठी ते आता नेमके काय करणार आहेत. स्वप्ना पाटकर यांना आता उबाठा नेत्यांकडून काय उत्तर येते याची प्रतीक्षा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *