News Bharati

निलेश लंकेच्या समर्थकांकडून गर्भवती महिलेवर हल्ला; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : निलेश लंके (Nilesh Lanke) यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांनी गर्भवती महिलेवर हल्ला केल्याचा गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्र भाजपा (BJP) महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्र वाघ (Chitra Wagh) यांनी शरद पवार गटाचे नेते आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्यावर लावला आहे. तसेच त्यांनी राक्षसीपणे आपला विजय साजरा केल्याचाही त्यांनी म्हटलंय.

चित्र वाघ यांनी ‘X’ अकाउंटवरून पोस्ट करून निलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरेंवर गंहीर आरोप केले आहेत, चित्र वाघ म्हणाल्या कि, \”आम्हाला निवडणुकीत आलेला पराभव आम्ही स्वीकारला मात्र शरद पवार गटाचे काही पदाधिकाऱ्यांनी त्यांचा विजय साजरा करण्याचा राक्षसी पॅटर्न दाखवून दिला.\”

\”पारनेरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांनी राक्षसीपणे आपला विजय साजरा करण्यास सुरुवात केली. हाती दहा-पंधरा कार्यकर्त्यांना घेऊन महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा प्रचार करणाऱ्यांवरती हल्ला सुरू केला. यांच्या डोक्यात सत्ता इतकी गेली की उन्मत्त झालेल्या या राहुल झावरेने पानबंद यांच्या घरात घुसून एका गर्भवती महिलेवर आणि पानबंद यांच्या मातोश्रींवर शिवीगाळ करत जमावासह हल्ला केला,\” असे त्या म्हणाल्या.

\”या नराधमाला कायदा तर शिक्षा देईलच मात्र नवनिर्वाचित खासदार लंके आणि यांची नेता मोठ्ठया ताई या हरामखोर झावरेला शिक्षा देणार का पाठीशी घालणार हे पहावं लागेल. म्हणतात ना आलेलं यश पचवता आलं पाहिजे आणि मिरवता देखील आला पाहिजे. पण महविकास आघाडीच्या डोक्यात सत्ता जाऊ लागली. पण त्यांचा माज जय शिवरायांच्या पावनभूमीत सहन केला जाणार नाही. झावरे सारख्या औरंग्याच्या औलादिंना, या जिजाऊच्या लेकीच धडा शिकवतील,\” असा इशारा त्यांनी दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *