News Bharati

मुसलमानांकडून हिंदू कुटुंबांना दिवाळी साजरा करण्यापासून रोखण्याच्या धमक्या

मुंबईतील तळोजा भागात हिंदू कुटुंबांना दिवाळी साजरा करण्यापासून रोखण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार समोर आले आहेत, या घटनेने देशातील धार्मिक सौहार्द्राच्या विरोधात होणाऱ्या कृतींच्या वाढत्या प्रवृत्तीचे दर्शन घडवले आहे. हिंदूंना त्यांचा स्वत:चा सण साजरा करण्यापासून रोखण्याचा हा प्रकार फक्त एका धर्मावर आक्रमण नव्हे, तर सर्वसाधारण स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या हननाचे प्रतीक आहे.

भारत हा विविधतेने समृद्ध देश आहे, जिथे प्रत्येकाला आपला धर्म आणि संस्कृती जगण्याचे हक्क आहेत. मात्र, एका विशिष्ठ समजूकडून नेहेमी हिंदू समाजाला त्रास देणायचे काम सुरु असते. हे प्रकार केवळ कायदेशीर कृत्यांच्या पलीकडे जाऊन समाजाच्या मूलभूत मूल्यांवर प्रश्नचिन्ह उभे करतात. आता वेळ आला आहे की सर्व समाजाने, विशेषत: नेतृत्व आणि समाजसेवकांनी, संगठित होऊन अशा कृतींविरुद्ध उभे राहावे आणि सर्वांना त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक अधिकारांचे सन्मान करण्याची गरज आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *