प्रत्येक शिवभक्तासाठी अभिमानाचा क्षण; छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत !
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’चे जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून मानांकन मिळाले आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरला आहे. या मानांकनासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या […]