News Bharati

Kumbh Mela 2026

कुंभमेळ्याच्या तयारीला ‘गती’! त्र्यंबकेश्वर साधुग्राम, घाट आणि रस्त्यांचे आराखडे तत्काळ सादर करण्याचे आयुक्तांचे निर्देश

नाशिक : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील नियोजित साधुग्राम, गोदावरी नदीवरील घाट आणि डीपी रस्ता आणि त्याला जोडणाऱ्या जोड रस्त्यांचा आराखडा तत्काळ सादर करावा, असे निर्देश नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी आज दिले. सिंहस्थ कुंभमेळा अंतर्गत साधुग्राम व पायाभूत सोयी सुविधांची पाहणी व आढावा बैठक त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडली, त्यावेळी […]

कुंभमेळ्याच्या तयारीला ‘गती’! त्र्यंबकेश्वर साधुग्राम, घाट आणि रस्त्यांचे आराखडे तत्काळ सादर करण्याचे आयुक्तांचे निर्देश Read More »

‘ढोंगी वृक्षप्रेमाला मोहोर!’ ‘तुमचा खरा विरोध वृक्षतोडीला नाही, तर कुंभमेळ्याला;’ भाजपचा उबाठा, राज ठाकरे आणि शरद पवार गटावर हल्ला

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील ‘तपोवन’ येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापले असताना, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार गटावर जोरदार टीका केली आहे. ‘वृक्षवृल्ली आम्हा सोयरे… होय! संत तुकारामाचा वारसा आम्हीच चालवतो!!’ असे म्हणत उपाध्ये यांनी विरोधकांचे ‘वृक्षप्रेम’ ढोंगी असल्याची टीका केली

‘ढोंगी वृक्षप्रेमाला मोहोर!’ ‘तुमचा खरा विरोध वृक्षतोडीला नाही, तर कुंभमेळ्याला;’ भाजपचा उबाठा, राज ठाकरे आणि शरद पवार गटावर हल्ला Read More »

‘विकास भी, विरासत भी’! कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी नागरिकांनी आणि गुंतवणूकदारांनी दाखवलेला उत्स्फूर्त सहभाग अत्यंत कौतुकास्पद आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते नाशिक महापालिकेचा ‘क्लीन गोदावरी बॉण्ड’ समारंभपूर्वक सूचीबद्ध करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘विकास भी, विरासत भी’ हा पंतप्रधान नरेंद्र

‘विकास भी, विरासत भी’! कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »