टी-२० विश्वचषक : सूर्यकुमारच्या ८४ धावा आणि गोलंदाजांच्या जोरावर भारताचा अमेरिकेवर २९ धावांनी विजय
मुंबई : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या भारतीय संघाने अमेरिकेचा २९ धावांनी पराभव करत आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर शनिवारी (७ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव तारणहार ठरला, तर गोलंदाजांनी अमेरिकन फलंदाजीचा कणा मोडला. सूर्याचा वानखेडेवर धमाका (धावसंख्या: १६१/९)नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात […]