शाळा-शाळांमध्ये गुरु तेगबहादूर साहिबजींच्या बलिदानाचा जागर! छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ जानेवारीपासून भव्य स्पर्धांचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या थोर महात्म्याचा इतिहास, महत्त्व आणि त्यांच्या बलिदानाची महती शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये १५ ते २३ जानेवारी दरम्यान विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.) […]