‘कोण होतास तू, काय झालास तू?’ फडणवीसांनी अमित शाहांचा व्हिडिओ ट्विट करत उद्धव ठाकरेंना डिवचले; ‘व्होट बँक’साठी हिंदुत्व सोडल्याचा हल्ला!
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सुरू झालेले राजकीय युद्ध अद्यापही शमलेले नाही. त्यातच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा संसदेतील व्हिडिओ ट्विट करत शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जोरदार डिवचले आहे. ‘कोण होतास तू, काय झालास तू?’ असे म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर हिंदुत्व सोडून अल्पसंख्यांकांची मते मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा […]