गोमांस तस्करांवर ‘मोक्का’, राज्यात लवकरच नवा कठोर कायदा; गोरक्षकांवरील गुन्हे मागे घेणार – गृहराज्यमंत्री पंकज भोयर
मुंबई : राज्यात गोमांस तस्करी (Beef Smuggling) वारंवार करताना आढळून आल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) (Mcoca Act) लावण्यात येईल. यासंदर्भात आगामी अधिवेशनात गोमांस तस्करीविरोधात स्वतंत्र कायदा करण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी विधान परिषदेत दिली. राज्याने महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) विधेयक, १९९५ अंतर्गत गोहत्या, विक्री आणि गोमांस […]