News Bharati

\”माझी लाडकी बहीण योजने\”वर टीका करणाऱ्यांना शहाजीबापू पाटील यांचे सडेतोड प्रत्युत्तर; संजय राऊत यांच्यावरही जोरदार हल्ला

\”माझी लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर विरोधकांनी विविध शब्दांत सातत्याने टीका केली, त्याचा शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी भरपूर समाचार घेतला. यावेळी पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर विरोधक कशा रीतीने रोज वेगवेगळ्या शब्दांत टीका करतात, हे स्पष्ट आहे. जर तुम्ही खरे बाप आहात, तर एका शब्दावर ठाम राहा.” असे स्पष्टपणे सांगून त्यांनी विरोधकांच्या टीकेवर कडवट प्रतिक्रिया दिली.

शिवाय, संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही त्यांनी हल्ला चढवला. शहाजीबापू पाटील म्हणाले, \”मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन\” योजनेवर होत असलेल्या टीकेला सडेतोड उत्तर देताना शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. नुकत्याच झालेल्या एका मेळाव्यात बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, ‘संजय राऊत यांना खासदार होण्यासाठी शहाजी पाटील यांनी मत दिले. पण ते इतकी वर्षे खासदार आहेत, त्यांनी आतापर्यंत एखादे काम खासदार निधीतून केल्याचे कुठे दिसत नाही. त्यांनी त्यांच्या कामबद्दल कधी काही सांगितले का? ते आता आपल्याबद्दल बोलत नाही. कारण एकदाच त्यांना असे उत्तर दिले आहे, की त्याची बडबड कायमची बंद केली,’ अशी तिखट टीका शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केली.\”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *