News Bharati

ग्रामीण डाक सेवक भरती: नवी मुंबईत ५१ जागांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय पोस्टातील (Indian Post) रिक्त जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरु असून नवी मुंबईतील कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय डाक विभागाच्या नवी मुंबई विभाग कार्यक्षेत्रातील डाक सेवक पदासाठी ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. अशी माहिती नवी मुंबई विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी दिली आहे.

नवी मुंबई कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदाच्या ५१ जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. इतर कोणत्याही माध्यमाद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच भारतीय डाक विभागाद्वारे उमेदवारांना केवळ पत्रव्यवहार केला जातो, फोन कॉल्स केले जात नाहीत. तसेच उमेदवारांनी वैयक्तिक माहिती कुणालाही देऊ नये, असेही अधीक्षक डाकघर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *