News Bharati

भारतीय जनता पक्षाची तिसरी यादी जाहीर

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २०२४ साठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली.  महाराष्ट्रातील निवडणूकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे, अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. या पार्श्वभूमी सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांची गणिते जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

पहिली यादी ९९ उमेदवारांची, दुसरी यादी २२ उमेदवारांची यापाठोपाठ भाजपानं आज तिसरी यादी २५ उमेदवारांची जाहीर केली आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून १४६ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मोर्शी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून देवेंद्र भुयार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता भाजपानंही या मतदारसंघातून उमेश यावलकर यांना उमेदवारी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *