परभणीत ग्रंथोत्सव : १६ व १७ मार्च रोजी साहित्याचा जागर; ग्रंथदिंडीने होणार शानदार सुरुवात
परभणी : परभणी शहरातील वसमत रोडवरील जिल्हा ग्रंथालय कार्यालय परिसरात येत्या १६ आणि १७ मार्च २०२६ रोजी दोन दिवसीय ‘ग्रंथोत्सव-२०२५’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित हा उत्सव जिल्ह्यातील वाचनप्रेमी, विद्यार्थी आणि साहित्यिकांसाठी ज्ञानाची मोठी मेजवानी ठरणार आहे. ग्रंथोत्सवानिमित्त विविध परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन आणि साहित्यिक संवाद यांसारख्या समृद्ध कार्यक्रमांचे आयोजन […]