जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त कोल्हापुरात २ लाख भाविकांसाठी भव्य अन्नछत्र; ‘सहज सेवा ट्रस्ट’चा सलग २६ व्या वर्षी सेवायज्ञ
कोल्हापूर : श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त दरवर्षी लाखो भाविक डोंगरावर गुलाल-खोबऱ्याची उधळण करण्यासाठी येतात. या भाविकांच्या सेवेसाठी कोल्हापूरच्या ‘सहज सेवा ट्रस्ट’च्या वतीने यंदा ३० मार्च ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत गायमुख परिसरात भव्य अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या उपक्रमाचे २६ वे वर्ष असून, सुमारे २ लाख भाविकांना अहोरात्र महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे. […]