News Bharati

माजी आमदार सीताराम घनदाट यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश

माजी आमदार तथा अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम घनदाट (मामा) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला.

सीताराम घनदाट यांना गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्याने गंगाखेड विधानसभा मतदारसंघात विजयी होण्याचा विश्वास सामान्यांतून व्यक्त होत आहे. यावेळी दत्तराव भोसले, मधुसूदन लटपटे, शुध्दोधन सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *