News Bharati

सरकार स्थापनेत माझा अडथळा येणार नाही; एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाण्यात त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही त्यांची पहिली पत्रकार परिषद होती, त्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे केंद्रित झाले होते. सरकारने केलेल्या विकासकामांमुळे आणि कल्याणकारी योजनांमुळेच महायुतीला हे यश मिळाले आहे, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, \”मी पंतप्रधानांना सांगितले आहे की, माझ्यामुळे महाराष्ट्रात सरकार स्थापनेत काही अडचण येत असेल, तर तुमच्या मनात कोणतीही शंका ठेवू नका. तुम्ही जो निर्णय घ्याल, तो मला मान्य असेल. तुम्ही आमच्या महायुतीचे प्रमुख आहात. भाजपच्या लोकांनी जसे तुमचे निर्णय मान्य केले आहेत, तसेच आम्हीही मान्य करू. काल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून सांगितले की, सरकार स्थापनेत माझा काहीही अडथळा येणार नाही.\”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *