News Bharati

आरक्षणविरोधी काँग्रेसला फडणवीसांचे प्रत्युत्तर

आरक्षणविरोधी (Anti- काँग्रेसला फडणवीसांचे प्रत्युत्तर दिले आहे. माध्यमाशी बोलताना त्यांनी भाजपाची आरक्षणासंदर्भातील भुमिका स्पष्ट केली.

नाना पटोले(Nana Patole) हे राहुलभक्त आहेत. त्यामुळे वारंवार ते आरक्षणावर बोलतात. माननीय इंदिराजींनी तसेच राजीवजींनी हीच भुमिका ठेवली होती. तीच आरक्षणविरोधी भुमिका परदेशात जावून राहुलजी मांडतांना दिसतात.

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना पटोलेंच्या भुमिकेबाबत टिका करताना हे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. जोपर्यंत भारताचे संविधान आहे आणि भारतात भारतीय जनता पार्टी आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकणार नाही. अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.  

आरक्षण विरोधी भुमिकेबाबत एका प्रसिध्दीमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. काँग्रेस आरक्षण संपवेल आणि समानता आणेल असे ते म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *