News Bharati

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं कामाचे चित्र प्रसिद्ध

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं कामाचे चित्र प्रसिद्ध केले.
महाविकास आघाडीने अडीच वर्षांत अनेक प्रकल्पांमध्ये अडथळे आणले. पण, महायुतीचं सरकार आल्यानंतर विकासाला गती मिळाली, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले, खासदार सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. महायुती सरकारच्या कामाचा आढावा घेणारं काम हीच आमची ओळख हे रिपोर्ट कार्ड या पत्रकार परिषदेत प्रकाशित करण्यात आलं.

महाविकास आघाडीचं स्थगितीचं सरकार २०२२ मध्ये जाऊन त्यानंतर महायुतीचं गती आणि प्रगतीचं सरकार आलं. महाराष्ट्रात परिवर्तन करणाऱ्या योजना महायुती सरकारनं केल्या. शेती, शिक्षण, नदीजोड तसंच सिंचन प्रकल्प, विविध प्रशासकीय घटकांसाठी दिलासा अशा योजना महायुती सरकारने आणल्या, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रात काल विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी महायुतीने आज सरकारच्या आजपर्यंतच्या कामांचा आढावा घेणारं प्रगती पुस्तक प्रकाशित केलं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *