News Bharati

शरद पवारांना धक्का; पारनेरचे प्रमुख नेते अजित पवारांच्या गटात दाखल

अहिल्यानगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. पारनेरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघात (Parner Assembly Constituency) अजित पवारांनी शरद पवार गटाला मोठा धक्का मोठा धक्का दिला आहे. माजी नगराध्यक्ष विजय औटी, धनगर समाजाचे नेते शिवाजीराव गुजर यांच्यासह प्रमुख नेत्यांनी मुंबईत पक्षाध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला.

आज पारनेर विधानसभा मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. सुजित झावरे, माजी बांधकाम सभापती श्री. काशिनाथ दाते, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. माधवराव लामखेडे, माजी नगराध्यक्ष श्री. विजय सदाशिव औटी, धनगर समाजाचे नेते श्री. शिवाजीराव गुजर यांनी त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामुळे, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला पक्षप्रवेशामुळे बळ मिळाले आहे. तर, शरद पवारांसह खासदार निलेश लंके यांना हा मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यावेळी अजित पवारांनी सर्वांचं स्वागत केलं आणि सर्वजण एकत्र येऊन पारनेरमध्ये राष्ट्रवादीला बळकटी द्याल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *