News Bharati

अनुष्का शर्मा व विराट कोहली चा राम नामाचा जप करतानाचा चा व्हिडिओ झाला व्हायरल…

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली लंडनमधील कीर्तनात \”श्री राम, जय राम\” म्हणत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आध्यात्मिक प्रवृत्तीसाठी ओळखले जाणारे हे जोडपे भक्तिमय वातावरणात तल्लीन पाहायला मिळाले.

Twitter/X वर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट इतर भक्तांसोबत टाळ्या वाजवताना आणि जप करताना दिसत आहेत.

कीर्तनात तल्लीन झालेले हे जोडपे शांत आणि समाधानी दिसत होते. अनुष्का आणि विराट कोहलीची अध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती नवीन नाही. ते याआधी देखील भारत आणि परदेशात विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. कीर्तनाचा हा नवा व्हिडीओ त्यांच्या आध्यात्मिक विश्वासाचा आणखी एक पुरावा आहे.

या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले असून सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्यांच्या भक्ती आणि साधेपणाबद्दल या जोडप्याचे चाहते त्यांच्यावर कमेंटच्या रुपाने प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हे कीर्तन लंडनमधील एका मंदिरात आयोजित करण्यात आले होते. विराटने नुकत्याच टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर पती पत्नी एकत्र वेळ घालवत आहेत.

\"\"

अनुष्का शर्माने तिच्या गरोदरपणाचे अनेक महिने प्रसिद्धीच्या झोतात राहून लंडनमध्ये घालवले होते. त्यामुळे अकायचा जन्म लंडनमध्ये झाला असा समज निर्माण झाला आहे . या घडामोडींमुळे चाहत्यांमध्ये अंदाज आहे की अनुष्का आणि विराट लंडनमध्ये कायमचे रहायला गेले की काय? आशी चर्चा सध्या सुरू आहे. या चर्चांवर विराट आणि अनुष्काने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.अनुष्का शर्मा पुढे चकडा एक्सप्रेसमध्ये दिसणार आहे. हा क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे. या चित्रपटामुळे तिचे सहा वर्षांनंतर चित्रपटात पुनरागमन होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *