मुंबईकरांना अभूतपूर्व दिलासा! पुनर्विकासातील २०० चौ. फूट जागा वाढूनही नोंदणी फी माफ; फडणवीस सरकारचे दमदार पाऊल
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी तसेच भाडेकरूंना मोठा दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नवीन इमारतींमध्ये जागा मिळणाऱ्या भाडेकरूंसाठी नोंदणी शुल्क (Registration Fee) माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाने घेतला असून, याबाबतचे परिपत्रक (Circular) जारी करण्यात आले आहे. […]