विदर्भ आता ‘इंडस्ट्रियल पॉवरहाऊस’; ऑटोमोबाईल ते ग्रीन स्टीलपर्यंत गुंतवणुकीचा पाऊस, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
नागपूर : गडचिरोली येथे जगातील सर्वात मोठे ग्रीन स्टील हब, नागपुरात सोलर मॉड्युल आणि अमरावतीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले पडली आहेत. निर्मिती आणि सेवा क्षेत्रात विदर्भाची घोडदौड सुरु आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारातून नागपूरमध्ये ऑटोमोबाईल उद्योगाचे पदार्पण झाले आहे, या सर्व प्रयत्नांतून येत्या ५ वर्षांत […]