News Bharati

भारतीय संस्कृतीचे जतन करायचे असेल, तर लिपी जिवंत ठेवणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : अक्षरलिपी या सभ्यता व संस्कृतीच्या वाहक असतात. भारतीय संस्कृती प्राचीन असून संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या लिपीचे जतन करणे गरजेचे आहे. अन्यथा आपला इतिहास विसरला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1884144071268262357

सुलेखनकार अच्युत पालव लिखित ‘अक्षरभारती’ या कॅलिग्राफी पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जहांगीर आर्ट गॅलरी येथे झाले. यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, नवनीत प्रकाशनाचे संचालक अनिल गाला, पद्मश्री अच्युत पालव उपस्थित होते.

पद्मश्री अच्युत पालव अक्षर कलेला सर्वत्र पोहोचवत असून अनेक लोकांना या कलेमध्ये समाविष्ट करत आहेत. कोणत्याही व्यक्तीला एखाद्या विषयात चांगले गुण मिळवायचे असतील तर त्यांचे अक्षर चांगले असणे आवश्यक आहे. एक मोठा ज्ञानाचा खजिना देखील या अक्षरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतो, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी अच्युत पालव यांचे पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अक्षरभारती’ पुस्तकाच्या माध्यमातून विविध अक्षर आणि लिपी यांचे सुंदर स्वरूप आपल्यापुढे मांडण्यात आले असल्याचे नमूद केले. अच्युत पालव हे अनेक भाषा-लिपी जोपासून सुंदर पद्धतीने सर्वांपर्यंत पोचवण्याचे महद्कार्य करत असल्याचे देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी सुलेखक अच्युत पालव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *