News Bharati

जपानच्या पर्यटकांनी महाराष्ट्र राज्याला जरूर भेट द्यावी; पर्यटनातून जपान-महाराष्ट्र संबंध अधिक दृढ होतील : शंभूराज देसाई

मुंबई : जपानच्या वाकायामा प्रांताच्या शिष्टमंडळाने पावनगड येथे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची भेट घेतली. राज्यात पर्यटन (Tourism) वाढीच्या दृष्टीने देण्यात येत असलेल्या सवलती व योजनांची माहिती यावेळी पर्यटन विभागाकडून शिष्टमंडळास देण्यात आली. जपानच्या पर्यटकांनी महाराष्ट्र राज्याला जरूर भेट द्यावी. पर्यटनातून दोन्ही प्रांतांतील परस्पर संबंध अधिक वृध्दिंगत होतील, अशी भावना याप्रसंगी मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, जपानचे वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय घडामोडीचे संचालक योशीओ यामास्ताचे, जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी, वाकायामाचे सोनोबे सॅन, महिरा हेदुयेकी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, अधिक्षक अभियंता शैलेंद्र बोरसे, यावेळी उपस्थित होते.

एप्रिल महिन्यात महाबळेश्वर येथे होणाऱ्या पर्यटन महोत्सवास जरुर यावे, असे आग्रहाचे निमंत्रणही पर्यटनमंत्री देसाई यांनी दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *