News Bharati

स्वामी समर्थांचे उदात्त विचार प्रेरणादायी…पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्वामी समर्थांचे उदात्त विचार प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची प्रतिमा भेट देण्यात आली आहे. आपले सरकार स्वामी समर्थांचा समाजाविषयीचा दृष्टिकोन प्रतक्षात उतरवण्याचा कायम प्रयत्न करत राहील, असं पंतप्रधानांनी या संदर्भात समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे.

“आज स्वामी समर्थ यांचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून स्विकारण्याचे भाग्य मला लाभले. हे मी कायम जपणार आहे… त्यांचे उदात्त विचार आणि शिकवण कोट्यवधी लोकांना प्रेरणा देत आली आहे. त्यांचा आपल्या समाजाप्रति असलेला दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.”

अशी प्रतिक्रिया या संदर्भातील पोस्टमध्ये त्यांनी लिहीली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *